एक भन्नाट ट्रिप – म्हैसूर, कुन्नूर , उटी आणि बेंगळुरूपर्यंत!

कधी कधी मनात येतं – “जरा कुठेतरी जावं… मोबाईल सायलेंट करावा… आणि मेंदूला ‘फ्लाइट मोड’ वर टाकावं!”
आमचंही असंच काहीसं झालं –
आणि मग झाली एक भन्नाट ट्रिप – म्हैसूर, कुन्नूर , उटी आणि बेंगळुरूपर्यंत!

म्हैसूर: एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक सफर

म्हैसूर, कर्नाटकमधील एक आकर्षक शहर, जिथे ऐतिहासिक वास्तुकलेचा धागा आणि सांस्कृतिक वारसा एकत्रितपणे भेटतात. ह्या शहराला भेट दिल्यानंतर, प्रत्येकाला एक विशेष अनुभव मिळतो.

(Mysore Palace)
म्हैसूर महाल, ह्या शहरातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हा महाल कर्नाटकमधील राजघराण्याचा ऐतिहासिक ठेवा आहे. विविध वास्तुशिल्पाचे मिश्रण असलेला हा महाल, त्याच्या भव्यतेने प्रत्येकाला मंत्रमुग्ध करतो. रात्री सुसज्ज असलेल्या महालाचे दृश्य अतिशय सुंदर आहे.
महालात शिरलो आणि इतकी भव्यता की डोकं फिरायला लागलं (अर्थात सौंदर्याने, उन्हामुळे नाही). प्रत्येक कोपऱ्यात एक फोटोशूट.
महालात रात्री काही वेगळाच देखावा असतो. सूर्य मावळतो आणि महालाच्या भव्यतेला एक खास लाईट शो सुरू होतो. त्या शाही महालात रात्रीच्या ताऱ्यांसोबत लाइट्स चांगलेच वाजतात, आणि ते एकदम ‘राजेशाही पार्टी’ होईल असं वातावरण तयार करतं.

चामुंडेश्वरी मंदिर
चामुंडेश्वरी मंदिर हे म्हैसूरच्या एक पर्वत शिखरावर स्थित आहे. ह्या मंदिराची महत्वाची खासियत म्हणजे देवी चामुंडेश्वरीची पूजा, जिच्या दर्शनासाठी हजारो पर्यटक येथे येतात. पर्वतावर चढून दर्शन घेतल्यावर, संपूर्ण म्हैसूर शहराचे दृश्य मंत्रमुग्ध करणारे आहे.
चामुंडी मंदिर चढायला लागलो आणि पहिल्या १० पायऱ्यांनंतर आमचं श्रद्धेवरून फिटनेसकडे लक्ष गेलं. “देवी दर्शनासाठी मेहनत घ्या” असं कुणीतरी खाली बोर्ड लावला असतं तर बरं झालं असतं.
वर पोहोचलो तेव्हा असा वाटलं की देवीने आमचं नक्कीच येणं पावन केलंय —

म्हैसूरहून उटीला गाडीने निघालो आणि वाटेत बंदीपूर फॉरेस्ट रोड लागला – जिथं निसर्ग म्हणतो, “मोबाईल सिग्नल विसरा, पण सौंदर्य अनुभवा!”

जसा रस्ता जंगलात शिरतो, तसं आम्ही एकदम National Geographic मोड मध्ये गेलो — डोळे मोठे, कॅमेरे सज्ज आणि आवाज मात्र अगदी हळू, कारण वाटेत वाघ भेटला तर आपला “रिअ‍ॅक्शन व्हिडीओ” व्हायला नको.
जंगल सुरु होताच पहिल्याच वळणावर माकडांचं टोळकं – एकदम सेलिब्रिटी स्टाईल स्वागत केलं
एका वळणावर अचानक समोर हत्तींचा रस्ता क्रॉसिंग कार्यक्रम सुरु झाला. गाडीत एकदम शांतता – एवधी शांतता की गूगल मॅप सुद्धा म्हणालं, “काय झालं रे?”
सगळे अगदी फोटो काढू का पळू ? हा प्रश्न घेऊन थांबले. आमचा ड्रायव्हर captain श्रीनिवास मात्र प्रो — म्हणाला, “अहो, हत्ती रोजचे पाहुणे आहेत!”

रस्ता एवढा वळणावळणाचा आणि जंगलात लपलेला की वाटलं आपली ट्रॅव्हल vlog आता survival documentary होणार.
मागच्या सीटवर बसलेले लोक असे वळत होते जसं राइडिंग गेममध्ये आहेत.
जंगल संपता संपता वाटलं – “अरे, हे तर निसर्गाचं open air museum आहे!”
थोडं पुढं गेलं की मुधुमलाई जंगल सुरू – पण ते वेगळा अध्याय, वेगळं अॅडव्हेंचर!

हा रस्ता म्हणजे फक्त एक प्रवास नव्हे, तर मन शांत करणारा, डोळे विस्फारणारा, आणि थोडाफार अंगात थरकाप आणणारा थरारक अनुभव आहे.

जंगलाच्या त्या शांततेत काहीतरी वेगळं आहे – एक प्रकारचा संवाद, जो मोबाईलमधून नाही, तर निसर्गातून होतो.

बंदीपूरच्या जंगलातल्या निसर्गसंपन्न शांततेतून बाहेर पडताच वाट लागते घाटांच्या जगात — म्हणजेच उटी घाट सेक्शन!

पाहिलं वळण आलं – छान!
दुसरं वळण – अजून छान!
सातवं वळण – पोटात गडबड सुरु.
दहावं वळण – समोरचं सौंदर्य बघावं की खिडकी उघडावी, हा मोठा यक्षप्रश्न!

ड्रायव्हर मात्र गाडी अशा स्टाईलने चालवत होता की वाटलं तोच F1 चा निवृत्त खेळाडू असावा.
वळणं इतकी तीव्र की काहीजणांनी गाडीची खिडकी पकडून मौन व्रत घेतलं.
हा घाट म्हणजे एक प्रकारचं emotional rollercoaster आहे –
डोळ्यांसाठी पर्वणी, पाठीसाठी परीक्षा आणि पोटासाठी परिक्षण!

पण जेव्हा आपण घाट पार करून उटीच्या थंड हवेत पाऊल ठेवतो…
तेव्हा वाटतं, “या सगळ्या वळणांना मनापासून धन्यवाद – कारण प्रवास इतकाच खास असतो जितकं ठिकाण!”

उटीला पोहोचलो आणि लगेच ठरलं – चला, आधी निसर्गाचा ‘हाय डेफिनिशन’ अनुभव घेऊया!” 🌿📸
पहिल्याच दिवशी आम्ही उटीत पोहोचल्यावर ‘आराम करू’ हा ऑप्शन कुणाच्या मेंदूतही नव्हता.
सगळे एकदम एनर्जीने भरलेले — म्हणजे जणू एखाद्याने चहा नाही, तर थेट बूस्टर इंजेक्शन दिलंय!

आमचा ड्रायव्हर captain श्रीनिवास म्हणाला,
“पहिले कून्नूरला जाऊया – डोंगरात पॉईंट्स भारी आहेत.”
आणि आम्ही लगेच – “चला तर मग!”

तिथून सुरु झाला आमचा कून्नूरचा ‘ग्रीन कार्पेट टूर’ – चहा चे मळे, डॉल्फिन नोज पॉईंट आणि लॅम्ब्स रॉक – त्यात भरपूर हशा, आणि फोटो!

कून्नूरच्या चहा चे मळे – हिरवाईचा इतका शुद्ध डोस, की डोळ्यांनाही ‘रीफ्रेश’ वाटलं! 🌿☀️🫖
गाडी वळली आणि अचानक समोर आले – अगदी टोकापर्यंत पसरलेल्या चहाच्या बागा!
जिथे नजर जाईल तिथे केवळ हिरवं हिरवं…

हवेत थंडावा, भोवती शांतता आणि त्या झाडांमधून वाहणारा मंद वारा…
हे सगळं इतकं सुंदर की काही वेळासाठी मोबाईल सुद्धा शांत झाला –
फोटो काढतानाही मनात आलं –
“कॅमेर्‍याने बघायचं की डोळ्यांनी?”

Dolphin’s Nose – “डोंगराचा डॉल्फिन आणि सेल्फीचा सीन”
सुमारे 12 किमी दूर, हा पॉईंट इतक्या उंचीवर आहे की खाली बघून पाय लटपटायला लागतात आणि वर बघून ‘ओ माय गॉड!’ निघतं.
आम्ही तर इतकं उंच गेलो की वाटलं, “थोडं अजून गेलो तर जिओ सिग्नल सुद्धा परत म्हणेल – ‘आऊट ऑफ कव्हरेज एरिआ!’”
इथल्या रॉकचं डॉल्फिनच्या नाकासारखं दिसणं ही निसर्गाची creative direction. add waterfall

लॅम्ब्स रॉक – “डोंगरावरचा लॅम्बचा थरार!”
डॉल्फिन्स नोजच्या वाटेवर, सुमारे 8 किमी अंतरावर असलेलं लॅम्ब्स रॉक, निलगिरीच्या डोंगररांगांमधील एक अद्भुत दृश्य देणारं ठिकाण आहे.
इथून चहा आणि कॉफीच्या बागा, तसेच कोयंबतूरच्या मैदानांचं दृश्य पाहायला मिळतं.
जंगलातून जाणाऱ्या वाटेवर पक्ष्यांचे आवाज आणि माकडांची धमाल, हे सगळं अनुभवताना वाटतं, “डोंगरावरचा लॅम्ब, आणि आमचं साहस – दोघांचं कॉम्बिनेशन जबरदस्त!”

कुन्नूरच्या हिरव्या हिरव्या चहा चे मळे पाहून आम्ही परत आलो उटीमध्ये — आणि तिथूनच आमचा दिवस सुरू झाला एका सुंदर,आणि ‘कॅमेऱ्याच्या मेमरी फुल’ करणा-या सफरीसाठी.

🌹 रोज गार्डन – ‘फुलांचा समुद्र आणि सेल्फीची वादळं!’
गाडी थांबताच समोर उभा होता एक दरवाजा… आणि आत? एक रंगांची लाट — लाल, पिवळा, गुलाबी, नारिंगी… इतके गुलाब की प्रत्येकाचं मन म्हणू लागलं, “हे असंच घरासमोर असायला हवं!”
एवढ्या वेगवेगळ्या रंगांच्या आणि आकारांच्या गुलाबांनी बाग अगदी स्वर्गासारखी वाटत होती.

🌿 बॉटनिकल गार्डन – ‘वनस्पतींची शाळा आणि आमचं निरीक्षण’
बॉटनिकल गार्डन म्हणजे थेट निसर्गाची एन्सायक्लोपीडिया!
प्रत्येक झाडाखाली पाटी होती — नाव, मूळ देश, आणि अजून बरंच काही.
बॉटनिकल गार्डन हे जसं नावात ‘बॉटनिकल’ आहे, तसंच त्याचं एकेक झाड, एकेक फुलं म्हणजे एक जिवंत जर्नल. प्रत्येक झाडाला पाटी —

“शिस्तीत नाव, वंश, आणि कुठून आलं तेही!”
गंमतीने विचारलं —
“इथे लग्नासाठी मुलगी पाहायला आलाय का काय? इतकी माहिती कशाला!”

बॉटनिकल गार्डन संपल्यावर आमचा गट गाडीत एकदम शांत झाला… कुणी खिडकीतून नजारा बघत होतं, कुणी डोळे मिटून ‘मनातल्या गार्डन’ मध्ये पुन्हा फेरफटका मारत होतं,
तर कुणी सरळ घोरायला लागलं!
आता दिवसभराचा थोडासा “थकवा” घेऊन आपण जरा लॉजवर जाऊया
रूममध्ये शिरलो आणि एकदम ‘अहाहा’ मोड चालू —
आणि मग ठरलं – “थोडा आराम, मग जेवायला जाऊ!”

श्रीनिवास भाऊ – आमचे गाइड, ड्रायव्हर आणि फूड गुरु
ते आम्हाला एका साध्याशा पण टेस्टी रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेले.
आत शिरताच वास आला — तूपातलं तडतडतं जिरं, गरम फुलका, आणि डाळफ्रायची आर्त साद!

उटीच्या पहाटेचा तो थंड स्पर्श… आणि आमचं शेवटचं ‘आव्हान’ – चहा, चॉकलेट आणि आठवणी!” 🌿🍫

रात्रीची शांत झोप, गरम पांघरूणात गुडूप आणि जाग येते ती डोंगराच्या हवेतल्या नाजूक थंडीने.
पडद्याआडून डोकावत असलेला सूर्य म्हणतोय –

“उठा मंडळी, अजून काहीतरी खास उरलंय!”

उटीच्या चहा फॅक्टरीच्या दारात शिरताच एक भन्नाट वास नाकात शिरतो – गोडसर धुरकट वास जो चहाचं प्रेम ताजं करतो.

सुरुवातीलाच एक टूर गाईड मशिनं दाखवत, सोप्या भाषेत सांगायला लागतो –

“हे बघा, ही मशीन पानं क्रश करते… ही रोल करते… आणि ही वाळवते.”
तिथेच एक मोठ्ठा काचेतून दिसणारा “चहा मळा” — हिरवागार मखमली चादरीसारखा पसरलेला! एकदम Instagram perfect!

आणि हो, सर्वात महत्त्वाचा भाग — Free चहा टेस्टिंग!

तिथं भरपूर प्रकारांचे चहा असतात:

Green Tea – ज्याची चव ऐकूनच लोकं डाएट सुरू करतात.

Ginger Tea – ज्याने घशापासून मन साफ होतं.

Masala Tea – घरची आठवण!

Chocolate Tea – हायब्रिड वाटावा असा अनुभव!

पुढे गेल्यावर आपण पोहोचतो Chocolate Factory मध्ये.
दारातच एक भिंतीवर लिहिलेलं असतं –

“Life happens, chocolate helps.”

इथे आतमध्ये गेल्यावर नजरेस पडतात फ्लेवर्सच्या यादीतले नावाचं गेटवे ऑफ स्वर्ग!

डार्क चॉकलेट

ऑरेंज फ्लेवर

स्पायसी चॉकलेट (हो, खरंच!)

कॅरमेल फ्युजन

अ‍ॅलमंड रॉक

तुळस फ्लेवर (जणू ‘तुळशीचं लग्न चॉकलेटसोबत!’)

आमचा परतीचा प्रवास सुरू झाला.”चलो अब बेंगळुरू!”

उटीहून चहा, चॉकलेट आणि आठवणींचं गाठोडं घेऊन आम्ही निघालो — थोडंसं थकल्यासारखं पण अजून काहीतरी राहिलंय असं वाटत होतं.
तेवढ्यात कुणीतरी आठवलं —

“अरे आपण म्हैसूरचं Vrindavan Garden बघायचं विसरलो ना!”

सगळे एकदम जागे झाले – जणू Google Calendar ने “Missing Memories” alert दिला होता!

दुपारी गार्डनमध्ये पाऊल टाकलं आणि एकदम हिरव्या गवताचा गालिचा, रंगीबेरंगी फुलांची मांडणी आणि सूर्यप्रकाशात चमकणारे पाण्याचे तलाव…
तसं म्हणायचं झालं तर, फाउंटन शो मिस झाला पण
‘Photo’ मात्र भरपूर मिळाले!

कधी झाडांमागे उभं राहून
कधी फुलांसमोर बसून
तर “कृपया गवतावर पाय ठेवू नका”च्या बोर्डाशेजारीच उभं राहून फोटो काढला!

…आणि मग सुरु झाला आमचा पुढचा प्रवास –
थोडा शांत, थोडा थकलेला, पण एकदम समाधानानं भरलेला!

रात्री उशिरा आम्ही बेंगळुरूला पोहोचलो. सगळे जरा थकलेले,
“कालपासून वाट बघतोय… ISKCON ला जाण्याची!”
मंदिरात शिरताच एकदम गारवा, मंत्रोच्चार आणि आरतीच्या घंटांचा नाद —

“इथं तर मोबाइलसुद्धा silent मोडमध्ये ध्यान करत असावा असं वाटतं!”

Tipu Sultan Museum –👑
Tipu Sultan Museum मध्ये प्रवेश केला आणि झक्कास इतिहास, बड्या राणी-महाराजांची जडजडीत शस्त्रास्त्रं आणि त्या काळाचे विशेष गड-बुरुज यांचा आनंद घेत बसलो.

समोर Tipu Sultan चं मोठं पोट्रेट दिसलं .

बेंगळुरू पॅलेस –
पॅलेसमध्ये शिरताच समोर आलं एक भव्य दालन –

“हे तर ‘Pre-Wedding Photoshoot’ चं ठिकाण वाटतंय!”
“राजेशाही बघितली, आता पोटासाठीही काही शाही लागेल!” 👑➡️🍛
captain श्रीनिवासचं ‘food radar’ पुन्हा ऑन झालं.
त्यांनी आम्हाला एका अशा ठिकाणी नेलं जिथे मेन्यू बघून वाटलं —

“हे वाचताना पोटातच घुंगरू वाजू लागले!” 😂

थाळी आली…
सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि फक्त एवढंच बोलले –

“या थाळीने ट्रिपचं क्लायमॅक्सच परफेक्ट केलं!”

बेंगळुरू पॅलेस नंतर – ‘राजेशाही’ अनुभवातून थेट विमानाच्या गेटपर्यंत! 👑✈️

✈️ Airport Entry – “बोर्डिंग पास, सुरक्षा आणि धावपळ!”
विमानतळावर पोहोचल्यावर एकदम कॉर्पोरेट स्टाईल मध्ये सगळे —

“ID Ready ठेवा… Boarding Pass काढा… Luggage Drop कुठं?”

पण… तिथेच सस्पेन्स —

“Flight is delayed by 2 hours due to India-Pak border alert!”

वेटिंग एरियामध्ये बसून आमचं फालतूपणा करणं चालू होतं –
पण शेवटी घोषणा झाली:

“Flight to Pune is ready for boarding.”

🛫 Finally, विमानात बसलो!

“विमानात स्थान घेता घेता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच भावना — ‘पुण्याचं स्वप्न आता साकार होणार!’”

फ्लाइटमध्ये बसल्यावर मात्र जरा शांततेची चाहूल लागली…
खिडकीतून शहराची लाइट्स दिसत होत्या,
आणि मनात आलं –

“किती आठवणी जमवून चाललोय आपण…
आता या क्षणांना उडू द्यायचं – आकाशात, पुन्हा कधीच न विसरण्यासाठी!”

✈️ टेकऑफ झाला… आणि म्हैसूर, उटी, कून्नूर, बेंगळुरू, captain श्रीनिवास, आणि सगळी मस्ती – मनात एकदम rewind!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top